Sunday, July 26, 2020

Bharatiya Ghatanecha Tu - भारतीय घटनेचा तू

भारतीय घटनेचा तू

भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे
।। धृ ।।
भक्ती - भावं श्रद्धा सुमने तुला अर्पितांना 
कंठ दाटुनिये अमुचा, पूर लोचनांना... पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी, दुःख कोरत आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे
।। १ ।।
क्षुद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातुन काढून त्या तू  प्रकाशित केले... प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू , मार्ग दीप आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे
।। २ ।।
चंदना परी तू झिजूनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूची अमुचा तूचं बोधी वृक्ष... तूचं बोधी वृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे
।। ३ ।।


                                    कवि : रंगराज लांजेवार
संगीत : सुरमणी डॉ. प्रभाकर धाकडे
गायक : डॉ. अनिलकुमार खोब्रागडे

Watch It 👇
भारतीय घटनेचा तू 

Video Copyrights reserved with the owner

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

Bhimachya Kotavarti Varti - भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी

भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधीत कळी - २  भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी                             ...