Friday, July 17, 2020

Sanga Amhala Birla Bata Tata Kuthe Hay Ho - सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो

सांगा आम्हाला  बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो


सांगा आम्हाला  बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। धृ ।।
घाम शेतात आमचा गळं, चोर ऐतच  घेऊन पळं
धन चोरांचा हा पाळण्याचा फाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। १ ।।
न्याय वेशीला  टांगा सदा, माल त्याचा कि आमचा वदा
करा निवाडा आणा तराजू  , काटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। २ ।।
लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवाले दादा आमचा आटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। ३ ।।
इथं बिऱ्हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं फडकं, घाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। ४ ।।
 इथं मिठ, मिरची अन तुरी, तिथं मुर्गी, काटा, सुरी
सांगा आम्हाला मुर्गी,कटलेट, काटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। ५ ।।
 शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला
वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो
।। ६ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...