Monday, July 27, 2020

Tujhech Dhammchakra He Phire Jagavari - तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी

तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी

तुझाचं गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
बुद्धमं सारणं गच्छामी, बुद्धमं सारणं गच्छामी
।। धृ ।।
कळ्या कळ्या, फुले फुले तुला पुकारती
पहा तुझीचं चालले नमतं आरती
तुला दिशा न्याहाळता यशोधरे परी
तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
।। १ ।।
तुझ्यामुळेच जाहला अखेर फैसला
दिलास धीर तोडल्या आम्हीच शृंखला
आता भविष्य आमुचे असे तुझ्या करी
तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
।। २ ।।
तुलाच दुःख आमुचे तथागता कळे
तुझीच सांत्वना आम्हा क्षणोक्षणी मिळे
निनाद पंचशीलचा घुमे घरोघरी
तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
।। ३ ।।

तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला
तुझ्यामुळेच सूर्य हि पुन्हा प्रकाशला
तुझेच सत्य या पुढे लढेल संगरी
तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
।। ४ ।।

तुझ्या समान एक ही नसे तुझ्या विना
सदैव या पुढे करू तुझीच वंदना
झरेल अमृता परी ~ ~ तुझीच वैखरी
तुझेचं धम्मचक्र हे फिरे जगावरी
।। ५ ।।

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...