Friday, July 17, 2020

Wadali Varyamadhi - वादळी वाऱ्यामधी

वादळी वाऱ्यामधी


वादळी वाऱ्यामधी तोफेच्या माऱ्यामधी

पाहिला भीम आम्ही राणी लढणाऱ्या मधी
।। धृ ।।
महाड क्रांतीमधी दिलं मर्दाचं जिणं
आपल्याच ओंझळीनं शिकवलं पाणी पिणं
पाहिला भीम तिथं तेजस्वी ताऱ्यामधी
पहिला भीम आम्ही राणी लढणाऱ्या मधी
।। १ ।।
पाहिला भीम आम्ही रामरथ ओढताना
पाहिला गुलामीची बेडी तोडतांना
पाहिला गोदातीरी मार खाणाऱ्या मधी
पहिला भीम आम्ही राणी लढणाऱ्या मधी
।। २ ।।
पाहिला भीम आम्ही दिल्लीला भांडतांना
दिन  दुबळ्यांची तिथं बाजू मांडतांना
पाहिला भीम आम्ही चढत्या पाऱ्यामधी
पहिला भीम आम्ही राणी लढणाऱ्या मधी
।। ३ ।।
वामन भीम तुझा चांदनी  हारामधी
पाहिला काल आम्ही बुद्धाच्या दारामधी
चांगल्या संस्कृतीचे दास होणाऱ्या मधी
पहिला भीम आम्ही राणी लढणाऱ्या मधी
।। ४ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...