Friday, July 24, 2020

Tujhich Kamai Ahe Ga Bhimai - तुझीचं कमाई आहे गं भीमाई

तुझीचं कमाई आहे गं भीमा

तुझीचं कमाई आहे गं भीमाई
कुणाचेच काही इथे कष्ट नाही
।। धृ ।।
लाभले ना जेथे प्यावयास पाणी, ज्ञानाची धारा अशा माळरानी
तुझ्याच प्रतापे आणलीस आई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही
।। १ ।।
वाळून ज्यांची पाने गळाली, घालून पाणी अशा फुलवेली
फुलवून गेली तूच ठाई ठाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही
।। २ ।।
सत् धम्म धेनू  दिलास दुधाळ, मिळे दूध आम्हा सदा सर्वकाळ
त्यातलीच आम्ही चाखतो मलाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही
।। ३ ।।
 कालचे रिकामे, आताचे निकामे, जगतात आई तुझियाच नामे
इथे गीत वामन खरे तेच गाई , कुणाचेच काही इथे कष्ट नाही
।। ४ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...