Saturday, July 18, 2020

Nirmili Janamanat - निर्मिली जनामनात

निर्मिली जनामनात तुचं दिव्या चेतना


निर्मिली जनामनात तुचं दिव्या चेतना
हे महान मानवा भीमा तुला हि वंदना
निर्मिली जनामनात ~ ~ ~ 
।। धृ ।।
पेरला सुरुंग तू महाडच्या तळ्यावरी
अदम्य शक्ती चेतली दलित माणसांतरी
जीर्ण रुढीच्याच वाटा काढल्या फुलाफुलांत
हे महान मानवा भीमा तुला हि वंदना
निर्मिली जनामनात ~ ~ ~ 
।। १ ।।
अनंत गाजल्या तुझ्या विशाल त्या परिषदा
ज्ञान एक जाणिलासं जीवनात संपदा
मुक्ती देतसे तुझी अखंड ज्ञान साधना
हे महान मानवा भीमा तुला हि वंदना
निर्मिली जनामनात ~ ~ ~ 
।। २ ।।
हे महान संविधान लोकशाहीला दिले
दास्य मुक्तीसाठी बुद्ध धम्मचक्र फिरविले
गर्जल्या दिशा दिशा तुझ्याच धम्म घोषणा
हे महान मानवा भीमा तुला हि वंदना
निर्मिली जनामनात ~ ~ ~ 
।। ३ ।।

कवि : इ . एम. नरनवरे

Watch it 👇


Video Copyrights reserved with the owner

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

Bhimachya Kotavarti Varti - भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी

भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधीत कळी - २  भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी                             ...