Sunday, July 26, 2020

Ashi Ramai Mahi Maay Va - अशी रमाई माही माय वं

अशी रमाई माही माय वं

जशी का सोन्याची सकाय वं
अशी रमाई माही माय वं
।। धृ ।।
रमाई गोरी गोरीपान वं, भीमाची सोन्याची खाण वं
दिपवलं तिनं हे अभाय वं, अशी रमाई माही माय वं
।। १ ।।
सोडवण्या सौंसाराची कोडी, भरलेली सौंसाराची गाडी
ओढली गाडी ती उल्हाय वं, अशी रमाई माही माय वं
।। २।।
तिनं आम्हाले माया लावली, उन्हात झाली मोठी साउली
नऊ कोटी वासरांची गाय वं, अशी रमाई माही माय वं
।। ३ ।।
बांद्यायले आंदी जेवू घातलं, जर काही उरलं नाही त्यातलं
तशीच भुकेली झोपी जाय वं, अशी रमाई माही माय वं
।। ४ ।।
प्रतापसिंगानं हि मानलं, भीमाचं दुःख तिनं जाणलं
भीमाच्या दुःखाचा उपाय वं, अशी रमाई माही माय वं
।। ५ ।।


कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

Watch it 👇






No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...