Friday, August 7, 2020

Lek Mi Bhimachi Naat Aahe Gautamachi - लेक मी भीमाची नात आहे गौतमाची

लेक मी भीमाची नात आहे गौतमाची


त्रिशरणाची पंचशीलेची मंगलमय धम्माची
करिन आरती धरतीवरती मंगलमय नामाची
लेक मी भीमाची नात आहे गौतमाची
।। धृ ।।
ते बाबा गेल्यापाठी, त्या पवित्र धम्मासाठी
जाळील सारी नवती, त्या नाग नदीच्या काठी
ठसली हृदयी मंगल वाणी, पवित्र त्या धम्माची
करिन आरती धरतीवरती मंगलमय नामाची
लेक मी भीमाची नात आहे गौतमाची
।। १ ।।
विसरून कुळाची थोरी, फासतील ज्या तारण्या पोरी
आवळी गळे तयाचे, ती कुंकवाची दोरी
त्या मार्गाने मला न जाणे, धिक अशा जन्माची
करिन आरती धरतीवरती मंगलमय नामाची
लेक मी भीमाची नात आहे गौतमाची
।। २ ।।
 हे शील कसे मी सांडू , पती प्रेम कसे मी सोडू
गोड अशा नवतीचा, बाजार कसा मी मांडू
चटणी मिरची माझ्या घरची, मिळो मला घामाची
करिन आरती धरतीवरती मंगलमय नामाची
लेक मी भीमाची नात आहे गौतमाची
।। ३ ।।
वामन तू आता यावे, ते प्रेम मला तू  द्यावे
भीम गौतमा वाणी, ते प्रेम मला तू द्यावे
असे भुकेली बहीण तुझी ही भावाच्या प्रेमाची
करिन आरती धरतीवरती मंगलमय नामाची
लेक मी भीमाची नात आहे गौतमाची
।। ४ ।।



कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...