Sunday, July 26, 2020

Jawa Nighali Maidani Shivrayachi Talwar - जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार

जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार

मोठे मोठे ते सरदार केले किती तरी ठार
जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार
।। धृ ।।
तलवार शिवाजीची आई जिजाऊंचं देणं
रक्त पिऊन वैऱ्यांचं तिनं मिटवली तहान
भोळ्या जनतेवर होणारा थांबविला अत्याचार
जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार
।। १ ।।
त्या तलवारीची मूठ, आली शिवबाच्या हातात
मग निघाली म्यानातून तिची चमचमती पात
तिचे विक्राळ रूप बघून, वैरी बावरले फार
जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार
।। २ ।।
शिवरायांनी वैऱ्यांवर जावा चढविले हल्ले
तलवारीच्या  पातीवर  सारे जिंकिले किल्ले
काम फत्ते झाल्या विना नाही घेतली माघार
जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार
।। ३ ।।
त्या आई जिजाऊंची होती कृपा शिवावर
हाथ मायेचा मणिका शिवबाच्या शिरावर
नावं ऐकता शिवबाचे वैरी कापायचे थर थरं
जावा निघाली मैदानी शिवरायांची तलवार
।। ४ ।।

कवि : माणिक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...