Friday, July 17, 2020

Bodhi Gayecha Mi Sheetal Sheetal Vara - बोधी गयेचा मी शितल शितल वारा

बोधी गयेचा मी शितल शितल वारा


बोधी गयेचा मी शितल शितल वारा  - २     करुणा गंध पेरणारा
सारा ~ ~ ~  करुणा गंध पेरणारा  - २
॥ धृ ॥
मुक्त पणे मी फिरतो येथे, कडे - कपारी शिरतो येथे  - २
भीमाचा तसा मी गौतमाचा प्यार  - २    करुणा गंध पेरणारा
सारा ~ ~ ~  करुणा गंध पेरणारा  - २
॥ १ ॥
लुंबीणीच्या वनात गेलो, तसा महूला मुदित झालो  - २
साऱ्यांच्या आधी मी पाहिला तेजाळ तारा  - २    करुणा गंध पेरणारा
सारा ~ ~ ~  करुणा गंध पेरणारा  - २
॥ २ ॥
कधी कधी मी गाठुन अंबर, तहानलेल्या तप्त भूमीवर  - २
सावेच येतो मी घेऊनीया जल धारा   - २    करुणा गंध पेरणारा
सारा ~ ~ ~  करुणा गंध पेरणारा  - २
॥ ३ ॥
वामन वानी  येईल येथे, प्रतापसिंग हि गायील येथे   - २
बुद्धाला भीमाला अंगी करणारा  - २     करुणा गंध पेरणारा
सारा ~ ~ ~  करुणा गंध पेरणारा  - २
॥ ४ ॥

कवी / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...