Saturday, July 18, 2020

Jay Bhim Ha Char Akshari - जयभीम हा अक्षरी

जयभीम हा  अक्षरी


जयभीम हा अक्षरी शब्द भारदार वाटतो
जयभीमच्या जागी दुसरा लुळा नमस्कार वाटतो
।। धृ ।।
म्हणू कसे मातंग तया, जयभीमवाला पोचीराम
जळता जळता आगीत हि,  क्रांती अंगार वाटतो
जयभीम हा अक्षरी शब्द भारदार वाटतो
।। १ ।।
जयभीमवाला कांशीराम आणिक मायावती
दोन चर्मकारांचा शब्द वजनदार वाटतो
जयभीम हा अक्षरी शब्द भारदार वाटतो
।। २ ।। 
ब्राम्हण्य त्यागले आणि धम्मधारी झाले चिटणीस
मोगलाई मध्ये गुलमोहोर, मला डेरेदार वाटतो
जयभीम हा अक्षरी शब्द भारदार वाटतो
।। ३ ।।
नागपुरी सुरेश गजलीया, बुद्ध - भीम अंगिकारतो
प्रतापसिंग भिक्षुकीतला, मला चमत्कार वाटतो
जयभीम हा अक्षरी शब्द भारदार वाटतो
।। ४ ।।


कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...