Friday, July 17, 2020

Godatiri Padala Tari Ladhala Sainik Majha - गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा

गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा


गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। धृ ।।
कानाची कवाडे  इथली, उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आघाडीस होता जरी नवकोटिंचा राजा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। १ ।।
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भिमाचीच वाणी
इतिहास होता चवदार  तळ्याचा ताजा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। २ ।।
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। ३ ।।
तळे बंद होती कोठे नदी बंद होती
कारण खलांची सारी पिढी अंध होती
अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। ४ ।।
राम दाखवारे तुमचा, राम दाखवारे
वामनास थोडी त्याची चवी चाखवारे
बोलले पुजारी जा धेडग्यांनो जा जा
उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा
।। ५ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

Watch it 👇


Video Copyrights Reserved with the owner

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...