Friday, July 17, 2020

Hi Hruday Vinechi Taar - हि हृदय विणेची तार

हि हृदय विणेची तार

हि हृदय विणेची तार, देत असे नवे झंकार
नमो बुध्दाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे
॥ धृ ॥
बोलला एक सम्राट ईथे  - २      केले रक्ताचे पाट ईथे  - ३
लाखावर केले ठार, त्यागली आता तलवार
नमो बुध्दाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे
॥ १ ॥
मी देतो तितुक घ्यावं तू   -  २    शिलाचं लेणं ल्यावं तु   -  ३
ऐकुण हे बुध्दं वचन, आम्रपालीचं मन
नमो बुध्दाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे
॥ २ ॥
भगवंत म्हणे का भटकावे  - २    मन हिंसे पाठी का धावे  - ३
तृष्णेवर घावं तु घाल, ऐकुनी अंगुलीमाल
नमो बुध्दाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे
॥ ३ ॥
रे प्रतापसिंगा यावं तू   - २        परिवर्तन गीतं हे गावं तु  - ३
दिक्षा भू वर भरदार, नऊ कोटींचा सरदार
नमो बुध्दाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे
॥ ४ ॥

कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...