दोनंच राजे ईथे गाजले
दोनंच राजे ईथे गाजले कोकण पुण्य भुमीवर - २
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ धृ ॥
रायगडावर शिवरायाचा राज्यभिषेक झाला
दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला
दोन नरमणी असे शोभले, दोन्ही विर बहाद्दर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ १ ॥
शिवरायाच्या हातामधी तलवार भवानी होती
त्याचं भवानीपरी भीमाच्या हाती लेखणी होती
निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ २ ॥
एक जिजा मातेने आणि एक मिरा आत्याने
क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भात्याने
दीपस्तंभ हे दोन लागले वदला अरबी सागर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ ३ ॥
राजाचा एक पुत्र दुजा, एक पुत्र सुभेदाराचा
दोघांचा तर एकचं बाणा होता उध्दाराचा
ईथे शिंपली, तिथे शिंपली अमृताची घागर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ ४ ॥
शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला
तोचं निवाडा भीमरायाच्या घटनेमाजी आला
प्रतापसिंगा परंपरेला, दोघे मारते ठोकर
एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर - २
॥ ५ ॥
कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे
Watch it 👇
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box.