Monday, August 3, 2020

Karite Puja Mi Aadhi Gautamachi - करीते पूजा मी आधी गौतमाची

करीते पूजा मी आधी गौतमाची

करीते पूजा मी आधी गौतमाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। धृ ।।
साहिले किती मी चटके उन्हाचे
उपकार होता करुणा घणाचे
पायधूळ झाले त्यांच्या आश्रमाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। १ ।।
राहिले तिथे मी धुळीच्या कणांत
आले इथे मी नव्या जीवनात
पावती मिळाली भीमाच्या श्रमाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। २ ।।
अशी गौतमाची लागलीय गोडी
गोडी मला ती विहारात ओढी
तिजोरीच वाटे मला ती धनाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। ३ ।।
आणिले भीमाने मला या विहारी
तिथे गौतमाची मोकळीक सारी
जाच नीच नाही वर्ण आश्रमाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। ४ ।।
वामन जागी तू उरी पोळताना
गीत गौतमाचे मुखी घोळताना
पिढी पेटवावी हि नव्या दमाची
मिळाली मला हि देणगी भीमाची
।। ५ ।।


कवि / गायक : वामन दादा कर्डक

Watch It👇


No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...