Sunday, July 26, 2020

Bhim Chandrama Rama Pournima - भीम चंद्रमा रमा पौर्णिमा

भीम चंद्रमा रमा पौर्णिमा

भीम चंद्रमा रमा पौर्णिमा
दोघे वंदता सिध्दार्थ गौतमा
।। धृ ।।
अंधारल्या जगाला न्याराचं नूर आला
उपमा हि सार्थ साजे भीमा आणि रमाला
उजळून काढल्या या धरतीच्या सिमा
भीम चंद्रमा रमा पौर्णिमा
।। १ ।।
या चांदण्याच्या धारा, हा मंद मंद वारा
प्रसन्न धुंद वाटे हा आसमंत सारा
सुगंध चंदनाचा येतोया घमघमा
भीम चंद्रमा रमा पौर्णिमा
।। २ ।।
कुणी राधे शाम बोले, कुणी सिता राम बोले
भीमा रमाच्या नवे तळाचे जग हे डोले
कुठेचं तोड नाही दोघांच्या संगमा
भीम चंद्रमा रमा पौर्णिमा
।। ३ ।।
बुध्दाचा शुध्द चेला, बुध्द पथाने गेला
प्रतापसिंगा पटला आंबेडकर जगाला
बोले हि नागासाकी, बोले हिरोशिमा
भीम चंद्रमा रमा पौर्णिमा
।। ४ ।।

कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...