Saturday, July 18, 2020

Jay Bhim Ghyawa, Jay Bhim Dyawa - जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा

जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा


जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा  - २
सन्मानाने, स्वाभिमानाने जपावा जपावा ~ ~ ~ 
जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा
।। धृ ।।
भीम स्पर्शाने झाले सोने, मुक्या जीवाला स्फुरले गाणे
भोळ्या जीवाला, साऱ्या गावाला, लागला सुगावा ~ ~ ~ 
जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा
।। १ ।।
टाका मोडून, काढा तोडून, जीर्ण रुढीला द्यावे सोडून
जन्मो जन्मीचा क्रूर कर्माचा, जाळूया पुरावा ~ ~ ~ 
जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा
।। २ ।।
मिळून सारे देऊ पहारे, दिन दुबळ्यांचे होऊ सहारे
निज  हृदयी, भीम सदेही, हसावा हसावा ~ ~ ~ 
जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा
।। ३ ।।
तथागतांची वाट समतेची, कास धरूया प्रबोधनाची
धम्म धारणा मनोकामना, ठरुद्या विसावा ~ ~ ~ 
जयभीम घ्यावा, जयभीम द्यावा
।। ४ ।।


कवि / गायक : राम बंधु  ( खंडू अढांगळे )

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...