Thursday, August 6, 2020

Trisharanachi Mangal Vani - त्रिशरणाची मंगल वाणी

त्रिशरणाची मंगल वाणी

त्रिशरणाची मंगल वाणी घुमते मंगल धामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। धृ ।।
एक संत असा कुलवंत, कुलवंत आणि शिलवंत
शिलवंताची साथ मिळाली अखेरच्या मुक्कामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। १ ।।
सर्वास मिळावा वाटा असा ज्ञान धनाचा साठा
ठेऊन गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। २ ।।
ना शोध कुणाचा उसणा दुःखाचे कारण तृष्णा
तोड तयावर सांगून गेला महान अंतर्यामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। ३ ।।
गाऊन शिलाची गाथा, जन म्हणती गाता गाता
इथेच नमतो माथा आता ज्ञान दुजे कुचकामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। ४ ।।
आली रे संधी नामी सांगितले वामनला मी
उचल पोतडी पंचशीलेची येईल आपुल्या कामी
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी
।। ५ ।।

कवी : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...