Friday, July 17, 2020

Pani Wadh Ga Maay - पाणी वाढ गं माय

पाणी वाढ गं माय


पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
लयी नाही मागत भर माझं, इवलंसं गाडगं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
।। धृ ।।
साऱ्यांच्या पडले पाया, आली ना कुणाला माया
पाण्याच्या घोटासाठी तळमळते माझी काया
कर्माचा वा धर्माचा, एक पोहरा काढ गं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
।। १ ।।
काळानं केलं काळं, जातीचं विणलं जाळं
पाण्याचा घोटासाठी तळमळतय माझं बाळं
पाज आम्हाला पाणी, नंतर डोळं फाडं गं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
।। २ ।।
गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा
जळणाचा लाकुडफाटा, मी आणुन देईन सारा
करीलं सारं काम तुझं, मी झाडीन वाडगं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
।। ३ ।।
बांधुन शिदोरी पाठी पाण्याचा घोटासाठी
दलितांचा वामन दादा, आला गं विहीरी पाशी
दुरून आल्या मुशाफिराला, जल्दी धाड गं
पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं
।। ४ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

Watch it 👇


No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...