Friday, July 17, 2020

Chandachi Chandani Yeun Khali - चांदाची चांदणी येऊन खाली

चांदाची चांदणी येऊन खाली


पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली
।। धृ ।।
 सफेद साडीवर सफेद खाणं चोळी
लेऊन आली गं गगनाची भोळी
ओवाळाया भीम सख्याला उतावळी ती झाली
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली
।। १ ।।
करी घरी कुणी पुरणाची पोळी
गीत कुणी ओठी भीमाचे घोळी
फोटोपाशी बसून कोणी म्हणे मिळाला वाली
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली
।। २ ।।
असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी
घुसळून देणारा तत्वाचे लोणी
असेच त्याचे गीत घुमावे निळ्या आभाळाखाली
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली
।। ३ ।।
जमेल जनसागर ऐकाया गाणं
उठ बिगी वामन तुला तिथं जाणं
 तुलाच घाली साद सकाळी, निळा नवा मखमाली
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली
।। ४ ।।

कवि / गायक : वामन दादा कर्डक

Watch it 👇


Video Copyrights reserved with the owner

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...