Sunday, July 26, 2020

Deyi Jibhes Godi - देई जिभेस गोडी

देई जिभेस गोडी

देई जिभेस गोडी भीमा रमाची जोडी
मजला विहारी ओढी भीमा रमाची जोडी
।। धृ ।।
भीमा रमाच्या आधी सारे अडून होते
कंठामधीच माझ्या सारे दडून होते
मुक्यास कंठ फोडी भीमा रामची जोडी
।। १ ।।
भीमा रमाने सारे हे विश्व व्यापलेले
डोळ्यामधी मी माझ्या सारे सामावलेले
ऐसी लडीक लाडी भीमा रमाची जोडी
।। २ ।।
ऐकून गोड गाणी मैफिल सारी डोले
 प्रतापसिंग दादा गाण्यामधून बोले
जणू भूप आणी तोडी भीमा रमाची जोडी
।। ३ ।।

कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

Bhimachya Kotavarti Varti - भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी

भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधीत कळी - २  भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी                             ...