Monday, July 27, 2020

Tava Vidyecha Maher - तवा विद्येचं माहेर

तवा विद्येचं माहेर

सावित्रीनं गिळलं अपमानाचं जहर
तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर
।। धृ ।।
झाला ज्योतिबा गुरुजी आणि विद्यार्थीनी ती
शिक्षिका हि होऊनी पुढे सरसावली ती
मुलींना शिकवाया तिनं कसली कंबर
तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर
।। १ ।।
तिची मैत्रीण फातिमा, एक होती मुसलमान
आली रुढीशी लढाया, जशी रझिया सुलतान
जणू आणावा पुण्याला मुळा - मुठानं बहर
तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर
।। २ ।।
जवा सावित्रीची मुक्ता एक निबंध लिहीते
तेव्हां सदाशिव पेठ तिला टकमक पहाते
एका मांगाच्या पोरीनं केला पुण्यात कहर
तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर
।। ३ ।।
तो प्रतापसिंग दादा मारी पुण्यात फेरफटका
भीडे वाड्यात घालवितो लई मजेत दोन घटका
भावी पिढीच्या मुली हे गीत गातील जरूर
तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर
।। ४ ।।

कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...