भीमयुगाची हि सोन्याची पहाट हाय
भीमयुगाची हि सोन्याची पहाट हाय
पाची पकवानाचं जेवायाला ताट हाय
आणि बसायाला चंदनाचा पाट - २
बापा भीमा ! तुझ्या पोरांचा न्याराचं थाट हाय - २
।। धृ ।।
तू स्वयंसूर्य होऊनी आला, शोधले भीमा तू भूगर्भाला
त्या भूगर्भातील एक विश्वाचा, विश्वनाथा तू पूजनीय झाला
तुझं निर्मीलेलं जग हे अफाट हाय
चहूकडे या जगाचा लखलखाट हाय
तू उधळलेली मोत्यांची हि लाट हाय - २
बापा भीमा ! तुझ्या पोरांचा न्याराचं थाट हाय - २
।। १ ।।
ठिगळया ठुगळाचं आईचं लुगडं,फाट की चोळी अंग हि उघडं
साजणी माझी घालते आता, अंगभर सोनं कापडं महागडं
उच्च राहणीमानाचा परिपाठ हाय
तुझ्या प्रतापाने मन आज ताठ हाय
वाहे सुखाची सरिता काठोकाठ हाय - २
बापा भीमा ! तुझ्या पोरांचा न्याराचं थाट हाय - २
।। २ ।।
त्या गरिबीच्या क्रूर माराने, अन विषमतेच्या ऊन वाऱ्याने
पोळलेल्यांची नवं पिढी बोले, तागलो जगलो रे तंव सहाऱ्याने
तुचं बोधितरु छाया तुझी दाट हाय
तुझं हिरवं हिरवं रान हे अफाट हाय
आम्हा बुद्ध आश्रमाची तुझी वाट हाय - २
बापा भीमा ! तुझ्या पोरांचा न्याराचं थाट हाय - २
।। ३ ।।
मूळचे इथले जे आदिवासी, कपटी लोकांनी केले वनवासी
ते गरुडपंखी होऊनी आता, उच्च शिक्षण हि घेती परदेशी
प्रतापसिंग म्हणे तुझी वहिवाट हाय
आता विकासाची गाडी हि सुसाट हाय
तुझ्या ज्ञानाच्या धनाची छनछनाट हाय - २
बापा भीमा ! तुझ्या पोरांचा न्याराचं थाट हाय - २
।। ४ ।।
कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box.