Friday, July 17, 2020

Vandan Manasala - वंदन माणसाला

वंदन माणसाला


वंदन माणसाला, वंदन माणसाला
दे कायेचे अन मायेचे चंदन माणसाला
।। धृ ।।
मानवतेची करुनी होळी भाजू नको रे पोळी
पिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी
ममता गौतमाची,समता गौतमाची
हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला
वंदन माणसाला, वंदन माणसाला
।। १ ।।
रणगाड्यांच्या रांगा आणि गडगडणाऱ्या तोफा
सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका
असला फौज  फाटा, असला शस्त्रसाठा
निर्जळील जग जाळील असले इंधन माणसाला
वंदन माणसाला, वंदन माणसाला
।। २ ।।
कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दासं
कष्टकऱ्यांच्या गळी बांधला, कुणी गुलामी फासं
वामन ऐक आता, सांगे भीमगाथा
जीर्ण पिढीचे, नको रुढीचे बंधन माणसाला
वंदन माणसाला, वंदन माणसाला
।। ३ ।।


कवि / गायक : वामन दादा कर्डक

Watch it 👇


Video Copyrights reserved with the owner.

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...