Friday, July 17, 2020

Udharli Koti Kule - उद्धरली कोटी कुळे

उद्धरली कोटी कुळे


उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। धृ ।।
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती 
तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती 
अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। १ ।।
जखडबंद पायातील साखळदंड
तडातड तुटले तू ठोकताच दंड 
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। २ ।।
खुजे वृक्ष तैसाच होता समाज
हिरवी हिरवी पाने पण तयालाच आज
अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। ३।।
धम्मचक्र फिरले गेला गेला कलं
ज्ञानदाता झाला आज रावस रंक 
पंकी सुगंध दरवळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। ४ ।।
काळ कौडीमोल जिणे वामनचे होते 
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते
बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 
।। ५ ।।

कवी : वामन दादा कर्डक
गायक : श्रावण यशवंते


Watch it 👇

Video Copyrights Reserved with the owmer

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...