Thursday, July 16, 2020

Chandanyachi Chaya Kaparachi Kaya - चांदण्यची छाया कापराची काया


चांदण्यची छाया कापराची काया


चांदण्यची छाया कापराची काया  - २
माऊलीची माया होता, माझा भीमराया  - २
॥ धृ ॥
चोचीतला चारा देत होता सारा  -  २
आईचा उबारा देत होता सारा  -  २
भीमाई परी, चिल्या पिल्यवरी  - २
पंख पांघराया होता माझा भीमराया 
माऊलीची माया होता, माझा भीमराया  - २
॥ १ ॥
बोलतात सारे विकासाची भाषा  - २
लोपली निराशा आता, लोपली निराशा  - २
सात कोटी मधी विकासाच्या आधी - २
विकासाचा पाया होता, माझा भीमराया  - २
माऊलीची माया होता, माझा भीमराया  - २
॥ २ ॥
झाले नवे नेते मलाईचे धनी  - २
वामनच्या मनी येती जुण्या आठवणी  - २
झुंज दिली खरी राम कुंडावरी  - २
दगड गोट खाया होता, माझा भीमराया  - २
माऊलीची माया होता, माझा भीमराया  - २
॥ ३ ॥


कवि / गायक : वामन दादा कर्दक


Watch It 👇


No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...