Friday, July 17, 2020

Maticha Sona Kela Bhimaan - मातीचं सोनं केलं भीमानं

मातीचं सोनं केलं भीमानं 


मातीचं सोनं केलं भीमानं, अशी भीमाची जादुगिरी   - २
आले किती युग, गेले किती युग  - २
युग हे आलंय आंबेडकरी   - २
अशी भीमाची जादुगिरी ~ ~ ~ 
।। धृ ।।
आंबेडकरी युग डौलाने डोले, बोल भीमाचे सोन्यानं तोले   - २
भीमाच्या लेकी सोन्यानं साजती  - २
रूपानं दिसती गुलमोहरी  - २
अशी भीमाची जादुगिरी ~ ~ ~ 
।। १ ।।
जातीयतेनं डागाळलेली भूमी भीमानं पुणीत केली  -  २
 राजी खुशीनं शेटा भटाच्या  - २
नांदती पोरी आमच्या घरी  - २
अशी भीमाची जादुगिरी ~ ~ ~
।। २ ।।
विद्यामृताचे प्राशून प्याले,जयभीमवाले साहेब झाले  - २
कुलकर्णी, देशमुख, बापट म्हणती  - २
भीमाची पोरं हरहुन्नरी   - २
अशी भीमाची जादुगिरी ~ ~ ~
।। ३ ।।
प्रतापसिंग होऊनी दंग, भीमा - रमाचे गायी अभंग   -
साथीला त्याच्या भजनात वाजे   - २
वाजे तुकड्याची खंजिरी  - २
अशी भीमाची जादुगिरी ~ ~ ~
।। ४ ।।


कवी / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे 


No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...