Wednesday, July 22, 2020

Gadgadle Megh Varti - गडगडले मेघ वरती

गडगडले मेघ वरती

गडगडले मेघ वरती, कोसळले धरती वरती
आला नदीला महापूर, रंगला भूमीचा नवा नूर
।। धृ ।।
नाचते नदीचे पाणी आणि ते नाव घेते
कापते किनारे आणि धरणीचा ठाव घेते
समतेच्या सिंधूसाठी सरिता हि धाव घेते
मागे हटणार नाही, पाणी अटणार नाही
चालली आता हि लई दूर ... रंगला भूमीचा नवा नूर
।। १ ।।
खडकाला देई धडका, सरिता हि वाट काढी
आडवे येईल त्याला, आडवे तेथेच पाडी
थरथरली वाटेवरची, जंगलाची दाट झाडी
पोलादी भिंत असली आणि वाटेत बसली
कापीत जाई तिचा ऊर ... रंगला भूमीचा नवा नूर
।। २ ।।
घडले हे छप्पन साली, क्रांतीची लाट आली
आली ती लाट आली मुक्तीची वाट झाली
माय - लेकरांची तेथे पुन्हा माय भेट झाली
क्रांतीचे गीत गाया, ममता पेरीत जाया
लाभले कवीला नवे सूर... रंगला भूमीचा नवा नूर
।। ३ ।।
वामन या धरतीवरती, कोठे घडलेच नाही
पाच लाख एकावेळी, पायी पडलेच नाही
असे कधी गौतमाशी, नाते जाडलेच नाही
पंचशिला त्रिशरणाने आणि मंगल चरणाने 
दुमदुमले सारे नागपूर...  रंगला भूमीचा नवा नूर
।। ४ ।।


कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...