Thursday, July 31, 2025

Ekateche Kumpan Bandha - एकतेचे कुंपण बांधा, लावा लळा


एकतेचे कुंपण बांधा, लावा लळा 


एकतेचे कुंपण बांधा, लावा लळा 

जीवाच्या पल्याड जपा भीमाचा मळा     ।। धृ ।।


कोण इथे शाहू, को चोर आहे

कोणं इथे भाऊ बंडखोर आहे 

कोण इथे केसाने हो कापतो गळा 

जीवाच्या पल्याड जपा भीमाचा मळा     ।। १ ।।


तुम्ही आता मालक भीमराया नंतर

तुम्ही आता चालक भीमराया नंतर

जागता पहारा ठेवा दिव्या सम जळा

जीवाच्या पल्याड जपा भीमाचा मळा     ।। २ ।।


काडी काडी गोळा करूनी भीमाने

असा दिला खोपा बांधूनी भीमाने

खोप्याकडे विजयानंदा सारे जणं वळा

जीवाच्या पल्याड जपा भीमाचा मळा      ।। ३ ।।


 ‌‌                           कवि : विजयानंद दादा जाधव

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

Bhimachya Kotavarti Varti - भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी

भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधीत कळी - २  भीमाच्या कोटा वरती रमा जणु सोनसाखळी                             ...